अरविंद केजरीवाल यांच्यांवर पत्रकार परिषदेत फेकला बूट

April 9, 2016 6:39 PM0 commentsViews:

दिल्ली- 09 एप्रिल :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्यावर बूट फेकण्यात आला.

दिल्लीत येत्या 15 एप्रिलपासून ‘ऑड-इव्हन फॉर्म्युला’ पुन्हा लागू होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री केजरीवालांची पत्रकार परिषद सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या वेद शर्मा नावाच्या व्यक्तीने केजरीवालांच्या दिशेने बूट फेकला. मात्र, स्टेजवर उपस्थित असलेल्या ‘आप’च्या एका सदस्याने तो पकडला आणि सुदैवाने बूट केजरीवालांना लागला नाही.

kejriwal Boot Fek

त्यानंतर वेद शर्माला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. सीएनजी स्टिकर घोटाळ्याचा निषेध म्हणून केजरीवालांच्या दिशेने बूट फेकला अशा वेद शर्माने म्हटलं आहे.

‘आम आदमी सेना’ ही संघटना ‘आम आदमी’ पक्षातून बाहेर पडलेलल्या काही सदस्यांनी स्थापन केल्याचं वेद शर्माने सांगितलं. याआधी काही महिन्यांपूर आम आदमी सेनेच्या भावना अरोरा यांनी केजरीवालांवर शाई फेकल्याची घटना घडली होती.

दरम्यान, काँग्रेस नेते पीसी चाको यांनी या घटनेला केजरीवाल यांची हुकूमशाही वृत्ती कारणीभूत असल्याचे म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close