दुष्काळामुळे जनावरांची कवडीमोल दराने विक्री

April 9, 2016 3:12 PM0 commentsViews:

शशी केवडकर, बीड - 09 एप्रिल :  जिल्ह्यात सर्वात मोठा जनावरांचा बाजार हा बीड शहराजवळच्या हिरापूरमध्ये भरतो. जवळपास पन्नास हजारांच्या आसपास दुभती जनावर विक्रीसाठी येतात. दुष्काळामुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढतेय. तर दुसरीकडे खरेदीदार कमी असल्यानं जनावरांना कमी किंमतींत विकावं लागतंय.

ËÖêêËÖêêËy

बीड तालुक्यातल्या केतूरमधल्या सुदर्शन घाडगेंनी खिल्लारी बैलांची जोडी या बाजारात विकली. लहानपणापासून ज्या बैलांसोबत त्यांनी शेतात घाम गाळलं, तीच जोडी विकतांना त्यांचं अंत:करण जड झालं. मुळातच डोक्यावर कर्ज आणि त्यात दुष्काळ यामुळे शेतात काहीच पिकलं नाही. माणसांनाच खायला अन्न नाही, तर जनावरांना काय घालायचं, या चिंतेतून त्यांनी मनावर दगड ठेवून आपल्या मुक्या सोबत्यांना बाजारचा रस्ता दाखवला. पण सव्वा लाखांची खिल्लारीची जोडी त्यांना 75 हजारांत विकावी लागली.

दुष्काळाचा फटका केवळ जनावरांच्या मालकांनाच बसत नाहीय, तर दलालांनाही त्याचा तडाखा बसतोय. जनावरांच्या विक्रीत त्यांना मिळणारी दलालीही आता कमी झालीय. या दुष्काळानं जनावरांवर उपासमारीच वेळ आलीय. त्याचसोबत त्यांच्या खरेदी-विक्रीवर अवलंबून असणारी यंत्रणाही दुष्काळात होरपळतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close