‘आयपीएल-9’चं शानदार उद्घाटन

April 9, 2016 8:24 PM0 commentsViews:

09 एप्रिल : आयपीएलच्या नवव्या सीझनचा उद्घाटन सोहळा काल (शुक्रवारी) रात्री मुंबईत पार पडला. वरळीत नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या इनडोअर स्टेडियममध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याच्या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूडचे स्टार्सनीही आवरजून हाजेरी लावली होती. तसंच सोहळ्यात आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांच्यासह सर्व टीमचे मालक आणि दिग्गज मंडळी उपस्थित होते. त्यानंतर आयपीएलच्या आठही टीमच्या कॅप्टन्सनी सर्व क्रिकेटर्सच्या वतीने खिलाडूवृत्तीची शपथ घेतली. पण या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते वेस्ट इंडीजचा क्रिकेटर ड्वेन ब्राव्होचा ‘चॅम्पियन्सस डान्स’. ब्राव्होने चलो चलो या गाण्यावरही डान्स केला. त्याशिवाय कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस आणि योयो हनी सिंग यांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्सही चांगलेच गाजले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close