चवदार तळे इथे जनसागर

March 20, 2010 6:43 PM0 commentsViews: 23

20 मार्चदलितांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथल्या चवदार तळे इथे 20 मार्च 1927 ला सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाला आज 83 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी आज महाडमध्ये दाखल झाले. आंबेडकरांवर आधारित विविध गाण्यांच्या कॅसेट्स, फोटो आणि पुस्तकांची दुकाने इथे मांडण्यात आली. येथे आयोजित कार्यक्रमात समता सैनिकांनी संचलनही केले. तर दुपारनंतर प्रकाश आंबेडकर यांची एकता परिषद, आरपीआयचे रामदास आठवले गट तर बामसेफच्या वतीनं भारत मुक्ती मोर्चा अशा जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले.

close