खडसे आणि वळसेपाटील यांच्यामध्ये चकमक

March 22, 2010 8:33 AM0 commentsViews: 7

22 मार्च विधानसभेत आज अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हरकतीचा मुद्दा असो औचित्याचा मुद्दा असो किंवा स्थगन प्रस्तावाची नोटीस असेल, विधानसभा अध्यक्ष वारंवार ती फेटाळून लावतात. उलट विरोधी पक्षाच्या सदस्यांना नियमांची आठवण करून देत सदस्यांना तंबी देतात, असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. यावरून वळसे-पाटील आणि खडसे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अखेर अर्ध्या तासासाठी विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आले.

close