व्हॅटवरून रंगणार सामना

March 22, 2010 8:38 AM0 commentsViews: 11

22 मार्चविधानसभेत आज व्हॅटवरुन सरकार विरुद्ध विरोध असा, सामना रंगण्याची शक्यता आहे. व्हॅट वाढवण्याबाबतचा निर्णय, सरकार आज विधानपरिषदेत जाहीर करण्याची शक्यता आहे. व्हॅटच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढणार्‍या किंमती आणि महागाईचा फटका यामुळे सरकारवर कडक टीका करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री आज राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत.दरम्यान व्हॅट विरोधात रिटेल व्यापार्‍यांनी उद्या एक दिवसाचा बंद पुकारला आहे. त्यामुळे किराणा मालाची दुकाने बंद राहणार आहेत. व्यापार्‍यांनी 27 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. 27 तारखेनंतर बेमुदत संप करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यभरातील सर्व व्यापारी संपात सहभागी होणार आहेत. या व्हॅट दरवाढीमुळे कोणकोणत्या गोष्टी महाग होणार त्यावर नजर टाकूयात- तांदूळ, गहू, आटा, रवा, मैदा, हळद, मिरचीवरील 0 टक्के व्हॅट 4 टक्के करण्यात आला आहेतर साबुदाणा आणि खाद्यतेलावर आता 4 ऐवजी 5 टक्के व्हॅट असेलपशुखाद्य, बियाणे, शेती अवजारे, खते, ट्रॅक्टर, पंपसेट महागतीलदुधाचे पदार्थ, मिठाई, बेकरी प्रॉडक्टस, फरसाणही महाग होईलबांधकाम साहित्य, कॉम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, औद्योगिक केबल्स, न्यूजप्रिंट, स्टेशनरीही महाग होईल

close