हायकोर्टाच्या दणक्यानंतर मार्ड डॉक्टरांचा संप सोमवारपर्यंत स्थगित

April 9, 2016 10:00 PM0 commentsViews:

dsadasd
09 एप्रिल : हायकोर्टाच्या निर्णयानंतर निवासी डॉक्टरांचा संप सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या संदर्भात हायकोर्ट सोमवारी अंतिम सुनावणी करणार आहे. त्यानंतर संपाबद्दल अंतिम निर्णय घेवू अस निवासी डॉक्टरांच्या संघटनेन म्हटलं आहे.

रुग्णांना होण्यार्‍या त्रासाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं ‘मार्ड’च्या संपकरी डॉक्टरांना चांगलंच फटकारलं असून दोन तासात संप मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, संध्याकाळी वैद्यकिय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याचं सांगितलं होतं. मात्र कोर्टाचा हा निर्णय प्राथमिक आहे, त्यात मागण्यासुध्दा मान्य झालेल्या नाहीत. मात्र संप सुरच ठेवल्यास कोर्टाचा अवमान ठरेल, त्यामुळे सोमवार पर्यंत वाट पाहण्याचा निर्णय मार्डने घेतला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा