नागपूरमध्ये नर्स संपावर

March 22, 2010 8:44 AM0 commentsViews: 1

22 मार्चनागपूरमध्ये सरकारी हॉस्पिटलमधील 204 नर्स संपावर गेल्या आहेत. गेल्या महिन्यात इन्क्युबेटरमध्ये लहान मूल दगावले होते. त्या प्रकरणाचा ठपका ठेवत दोन नर्सना निलंबित करण्यात आले. याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला. हे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी नर्सच्या संघटनेने नागपूर मेडिकल कॉलेजच्या डीनसोबत चर्चा केली.पण चर्चा फिस्कटल्याने नागपूर मेडिकल कॉलेज आणि सरकारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील 204 नर्स संपावर गेल्या आहेत. यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

close