काँग्रेस आमदाराला मारहाण करणार्‍या भाजप नगरसेवक शिव शर्माची हकालपट्टी

April 10, 2016 4:30 PM0 commentsViews:

sadsadsadyगोंदिया – 10 एप्रिल : काँग्रेसचे आमदार गोपाळदास अग्रवाल मारहाण प्रकरणी मारहाण करणारे शिव शर्माची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये.  भाजप शहराध्यक्ष हेमंत पटले यांनी अग्रवाल यांना मारहाण करणारे स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा याला पक्षातून निलंबित केलं आहे. तर दुसरीकडे आज काँग्रेसने गोंदिया बंदची हाक दिलीये. ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.

शिव शर्मानं शनिवारी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार गोपाळदास अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आमदार अग्रवाल यांच्या गोंदिया जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. अग्रवाल यांच्या डोळ्याला इजा झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार अग्रवाल यांची प्रकृती स्थिर आहे. आमदार गोपाळदास यांच्यावर झालेल्या हल्ल्यात भाजपचा काहीही संबंध नसल्याचं हेमंत पटले यांनी म्हटलंय. तसंच ही घटना दुदैर्वी आहे आणि भाजप या घटनेचा निषेध करतं असं पटले यांनी सांगितलंय. शिव शर्मांनी केलेली मारहाण ही वैयक्तिक वादातून घडली असावी असं पटले यांचं मत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close