दिल्लीसह उत्तरभारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला

April 10, 2016 9:24 PM0 commentsViews:

delhi_eartquakeनवी दिल्ली – 10 एप्रिल : दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यानं हादरलंय. दिल्ली आणि एनसीआर परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ही 6.8 रिश्टर स्केल नोंदवली गेली असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

दिल्ली-एनसीआर, श्रीनगर आणि उत्तरभारतातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे खळबळ उडाली. भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश डोंगरामध्ये या भूकंपाचं केंद्रबिंदू समतंय. पाकिस्तानमध्ये या भूकंपामुळे दोन जणांचा मृत्यू, तर चारजण जखमी झाले आहेत.

दीड मिनिटांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीतील मेट्रो काही तासांसाठी थांबवण्यात आलीये. भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे घरं-ऑफिसेसमधून नागरिक बाहेर पडले होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही दिल्ली सचिवालयात सहाव्या मजल्यावर भूकंपाच्या धक्क्यामुळे फर्नीचर हलले हे आम्ही पाहिलं. हे अत्यंत थरारक असंच होतं असं ट्विट केलंय. मी प्रार्थना करतो सर्वजन सुरक्षित असतील असंही सिसोदिया ट्विटमध्ये म्हणाले. तसंच आयपीएलसाठी मोहालीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेल स्टेनने सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले असं ट्विटवर सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा