अन्न सुरक्षा विधेयकावरून पवार सोनियांमध्ये मतभेद

March 22, 2010 8:49 AM0 commentsViews: 2

22 मार्चराईट टू फूड म्हणजेच अन्न अधिकार कायद्याच्या विधेयकाचा मसुदा आज केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात 'सर्वांसाठी अन्नाचा अधिकार' हा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या कायद्यात विशेष लक्ष घातले आहे. पण या विधेयकातील अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. अन्न अधिकार कायदा करताना एपीएल आणि बीपीएल असा भेदभाव असू नये, 3 रुपये दराने 35 किलो धान्य द्यावे, याबाबत सोनिया गांधी आग्रही आहेत. तर हा कायदा फक्त बीपीएल धारकांनाच लागू असावा आणि प्रत्येकी 25 किलो धान्य द्यावे, अशी कृषिमंत्री शरद पवार यांची भूमिका आहे.

close