आज सचिन-गांगुली आमने-सामने

March 22, 2010 8:54 AM0 commentsViews: 6

22 मार्चआयपीएलमध्ये सचिन तेंडुलकरची मुंबई इंडियन्स टीम फक्त एका दिवसाच्या ब्रेकनंतर आज पुन्हा मैदानात उतरणार आहे. टीमचा मुकाबला आहे, कोलकाता नाईट रायडर्स टीमशी. मॅच मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार आहे. पण दोन दिवसांपूर्वी बंगलोर चॅलेंजर्स बरोबर झालेली मॅच मुंबईने गमावली होती. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याचे दडपण मुंबई टीमसमोर असणार आहे. मुंबई टीमने सीसीआय ग्राऊंडवर जोरदार सराव केला. बंगलोर विरुद्ध बॅटिंगमध्ये झालेल्या चुका टाळण्याचा टीमचा प्रयत्न असेल. दुसरीकडे कोलकाता टीमने चांगल्या सुरुवातीनंतर पुढच्या दोन मॅच गमावल्यात. त्यामुळे पराभवाची मालिका खंडीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

close