प्रियदर्शिनी चॅटर्जी यंदाची मिस इंडिया

April 10, 2016 7:19 PM0 commentsViews:

गुवाहाटीच्या प्रियदर्शिनी चॅटर्जी हिनं यंदाची मिस इंडिया होण्याचा बहुमान पटकावलाय. सुश्रुती कृष्णा ही पहिली तर पंखुरी गिडवान ही दुसरी रनर अप ठरली. मुंबईमध्ये दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याला फॅशन आणि बॉलिवूडच्या बड्या सितार्‍यांनी आवर्जून हजेरी
लावली होती. शाहरुख खान, वरुण धवनची या सोहळ्यासाठी खास हजेरी होती. प्रियदर्शनीनं मिस इंडिया दिल्ली स्पर्धा जिंकून मिस इंडिया स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला होता. आता ती मिस वर्ल्ड 2016 या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा