ब्रिटनची सून जेव्हा सचिनच्या बाॅलिंगचा सामना करते…

April 10, 2016 8:21 PM0 commentsViews:

10 एप्रिल : ब्रिटनचं शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन सात दिवसांच्या भारत आणि भूतान या देशांचा ते दौर्‍यावर आहे. आज मुंबई एअरपोर्टहून हे शाही दाम्पत्य हॉटेल ताजमध्ये गेले तिथे त्यांनी 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना, मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला ओवल मैदानाकडे…जिथे एनजीओतल्या मुलांसोबत ते क्रिकेट खेळले.. ज्यात केट मिडलटन यांनी जोरदार बॅटिंग केली..आणि बॉलिंग केली खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं…त्यानंतर या दोघांनीही बाणगंगेला भेट दिली.. त्यानंतर हे दाम्पत्य बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटीजचीही भेट घेणार आहेत. ज्यामध्ये शाहरुख खान, सोनम कपूर,रणवीर सिंग यांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा