लातूरकरांसाठी मिरजेत वॉटर एक्स्प्रेस भरतेय, पण प्रक्रिया धीम्या गतीने

April 10, 2016 8:31 PM0 commentsViews:

10 एप्रिल : दुष्काळाने होरपळणार्‍या लातूरकरांना रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी आज मिरजेत वॉटर एक्स्प्रेस दाखल झालीये. दुपारपासून या वॉटर एक्स्प्रेसमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मात्र ती धीम्या गतीने सुरू आहे. संध्याकाळपर्यंत फक्त एका टँकमध्ये पाणी भरण्यात आलंय. त्यामुळे सगळे टँक भरून पाण्याची ट्रेन लातूरला कधी जाणार हा प्रश्न आहे.miraj_Water_express

वॉटर एक्स्प्रेस दुपारी मिरज रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झाली. दुपारी 2 वाजल्यापासून पाणी भरायला सुरुवात झालीय. सध्या 10 टँकमध्ये पाणी भरायचं आहे. त्यामुळे हे सर्व टँक भरण्याचं काम पहाटेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. पाण्याने भरलेले 10 टँक पाठवायचे की आणखी 10 टँक उद्या दिवसभर भरून 20 टँक पाठवायचे याचा निर्णय सांगली आणि लातूर जिल्हा प्रशासन घेणार आहे.

जर 10 टँकचं पाठवायचं ठरलं तर पहाटे 4 वाजता ट्रेन निघण्याची शक्यता आहे. लातूर रेल्वे स्थानकात हे पाणी आल्यानंतर ते विहिरीत सोडणे आणि तिथून हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि पाण्याचे वाटप करण्यासंबंधीच्या योजना याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्या गेल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close