नाव-पत्त्यासह पुरावे देऊ, मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

April 10, 2016 10:06 PM0 commentsViews:

11fadanvis_on_rajअमरावती – 10 एप्रिल : आम्ही नुसतं बोलत नाही तर करुन दाखवतो. आजपर्यंत शेतकर्‍यांसाठी जे काही काम केलंय त्याचा रेकॉर्ड असून तो नाव, पत्त्यासह देण्यासाठी तयार आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिआव्हान दिलंय. ते अमरावतीत बोलत होते.

राज्यभरात 35 हजार विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. तर त्या कुठे आहे ? जर तयार केल्याचं असतील तर त्या मला बघायला आवडेल असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात केलं होतं. मुख्यमंत्री हे अकार्यक्षम आहे. सत्तेवर येऊन तुम्हीच सांगा आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? अशी टीकाही राज यांनी केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचा रेकॉर्ड आहे. कोणत्या शेतकर्‍यांच्या शेतात विहीर खोदली, कुठे जलयुक्त शिवारचं काम झालं. या प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड असून तुम्हाला पाहिजे असेल तर नाव पत्त्यासह द्यायला तयार आहे. कारण, आम्ही करून दाखवतो नुसतं बोलतं नाही. असा खणखणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

तर नितीन गडकरी यांनीही यावेळी आपल्या शैलीत चांगलंच तोंडसुख घेत खडेबोल सुनावले. आम्ही काही ताज्युदिनबाबा नाही आहोत. तुमच्या सगळ्यांच्या काही अपेक्षा असतील आणि आमचं सरकार आहे आणि ते या सगळ्या समस्या सोडवतील. तर आमच्यात अशी ताकद नाहीये. आम्ही प्रयत्न नक्की करू. एकापेक्षा दुसरा जास्त प्रयत्न करेल. पण, हे सगळे कठीण प्रश्न असून अनेक वर्ष सुटले नाही आणि सुटणारही नाही. तुम्हाला आमचा मुर्दाबाद करायचा असेल कधीही करा. पण, काही लोकांचा हा धंदाच आहे अशा शब्दात गडकरींनी टीका केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा