मथुरेतील यात्रेत चेंगराचेंगरी, 2 ठार

March 22, 2010 11:45 AM0 commentsViews: 5

22 मार्चउत्तरप्रदेशातील मथुरेतील एका यात्रेत चेंगराचेंगरी होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मथुरा जिल्ह्यातील एका गावात यात्रा सुरु असताना पाण्याची टाकी कोसळली. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या गावकर्‍यांमध्ये पळापळ झाली. यामुळे झालेल्या चेंगराचेगरीत दोघांना जीव गमवावा लागला. येथील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

close