किरकोळ कारणावरुन शिक्षकाने केली विद्यार्थ्याला बुटाने मारहाण

April 11, 2016 11:46 AM0 commentsViews:

sangali_marahan4सांगली – 11 एप्रिल : किरकोळ कारणावरून एका शिक्षकाने 12 वर्षांच्या विद्यार्थ्याला काठी आणि बुटाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये घडली आहे. शिक्षक अतुल जमदाडे यांनी विश्वजीत पाटील या विद्यार्थ्याच्या तोंडावर आणि पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण केली आहे. मारहाणीची गंभीर घटना घडून सुद्धा, तासगाव पोलिसांकडून, शिक्षक अतुल जमदाडे याच्या विरोधात मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तासगावमधील आनंद सागर स्कूलमध्ये शिकत असलेला विश्वजीत पाटील शाळेत खेळत असताना, गळ्यातील त्याची चांदीची चैन दुसर्या मुलाच्या हाताला लागली. त्या मुलाला साधं खरचटलं पण नाही आणि कोणतेही इजा पण झाली नाही. मात्र हा किरकोळ प्रकार असताना, शाळेतील क्रीडा शिक्षक शिक्षक अतुल जमदाडे यांनी विश्वजीत पाटील यांनी या विद्यार्थ्याच्या तोंडावर आणि पाठीवर वळ उठे पर्यंत मारहाण केली आहे. काठीने आणि बुडाने बेदम मारहाण केली. इतर शिक्षक त्या मुलाला सोडवत असताना सुद्धा जमदाडे याने विश्वजीतला मारहाण चालूच ठेवली.

या बाबत पालकांनी तासगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, तासगाव पोलिसांकडून, शिक्षक अतुल जमदाडे याच्या विरोधात मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कंत्राटी पद्धतीवर असलेले शिक्षक अतुल जमदाडे याला निलंबित केलं आहे. गंभीर प्रकरणांनानंतर या शिक्षकावर जुजबी कारवाई करण्यात आल्याने पालक संतप्त झाले आहेत. या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा