पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली, चाकरमान्याचे हाल

April 11, 2016 12:11 PM0 commentsViews:

western_trainमुंबई – 11 एप्रिल : ऐन सकाळी पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्याचे हाल झाले. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अर्धा तास रेल्वे ठप्प झाली होती. ओव्हरहेड वायर दुरस्तीचं काम पूर्ण झालं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी 7 च्या सुमारास विस्कळीत झाली होती. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावर दोन्ही बाजूच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला होता. बोरिवली आणि कांदिवली या स्टेशनदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यानं लोकल अर्धा तास ट्रॅकवरच उभ्या होत्या. अखेर ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. पण याचा परिणाम आताही जाणवतोय. बोरिवलीहून सुटणार्‍या गाड्या उशिराने धावत आहे. आणि त्यामुळे बोरिवली, कांदिवली, गोरेगाव इथून लोकल पकडणार्‍यांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळेया तिन्ही रेल्वे स्टेशनवर चाकरमान्याची एकच गर्दी उसळली. रेल्वे रखडल्यामुळे प्रवाशांनी बस, टॅक्सीकडे धाव घेतली. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. त्यामुळे ऐन सकाळी गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेनं चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अर्धा तास ताटकाळत ठेवल्यामुळे उशिराने ऑफिस गाठावे लागले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा