अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीत सुधारणा

October 12, 2008 7:33 AM0 commentsViews: 21

12 ऑक्टोबर,मुंबई- पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर अमिताभ बच्चन यांना काल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण आता बीग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत ठिक आहेत परंतु त्यांना आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्येच रहावं लागण्याची शक्यता आहे. बच्चन यांना काल लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल होतं. महानायक अमिताभ बच्चनवर त्यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त देशपरदेशातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. सगळ्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी अमिताभ बच्चनही तयारही झाले होते. घरातली पूजा आटोपून त्यांना भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना दर्शन देण्यासाठी हा महानायक तयार होत असतानाच त्यांची तब्बेत बिघडली, लगेचच त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंं. सुरुवातीला रुटीन चेकअप असल्याचं त्यांच्या कुुटंुबीयांनी स्पष्ट केलं. पण नंतर नानावटीतल्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आणि सगळ्या चाहत्यांच्या काळजातला टोका चुकला. मात्र अभिषेक बच्चननं वडिलांची प्रकृती ठिकअसल्याचं सांगत सगळ्यांची काळजी दूर केली.बीग बी यांना आणखी किती दिवस हॉस्पिटलमध्ये रहावं लागणार हे, त्यांच्यावर करण्यात आलेल्या टेस्टच्या रिपोर्ट्सनंतरच कळेल. मात्र अमिताभ बच्चन यांना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी त्यांच्या प्रत्येक चाहत्यांची प्रार्थना आहे.

close