आरटीओच्या गाड्यांची सोडली हवा

March 22, 2010 11:53 AM0 commentsViews: 4

22 मार्चनागपूर विभागीय आरटीओ कार्यालयात आज सकाळी एका ट्रक ड्रायव्हरने अनोख्या प्रकारे आंदोलन केले. कोळशाने भरलेल्या ट्रकला आर टीओने दंड ठोठावला. पण दंडाची रक्कम जास्त असल्याने ट्रक चालकाने आपली नाराजी व्यक्त केली. पण आरटीओ अधिकार्‍यांनी त्याचे ऐकून न घेतल्याने त्याने आज सकाळी आरटीओ कार्यालयाला कुलूप ठोकले आणि अधिकार्‍यांच्या पिवळ्या दिव्याच्या गाड्यांची हवा सोडून दिली. त्यानंतर ट्रक घेऊन तो पसार झाला.

close