विरारमध्ये व्यापार्‍यावर गोळीबार करून 30 लाखांची रक्कम पळवली

April 11, 2016 1:55 PM0 commentsViews:

मुंबई – 11 एप्रिल : विरारमध्ये एका तांदूळ व्यापार्‍यावर गोळीबार करण्यात आला आणि जवळपास 30 लाखांची रक्कम घेऊन चोरटे फरार झाले आहेत. यात गंभीर जखमी झालेले तांदूळ व्यापारी रमणलाल शहा यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर विरारच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

virar_firingविरार पूर्व चंदनसार रोडवर होलसेल तांदुळ बाजाराचे मोठे दुकान आहे. रविवार सुट्टीच्या दिवशी या दुकानावर तांदळाची मोठ्याप्रमाणात विक्री होते. दिवसभराचा गल्ला तांदळाच्या थैलीत घेऊन दुकान मालक रमनलाल शहा रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास घरी जात असतांना समोरून पल्सर मोटरसायकलवर आलेल्या तीन जणांनी शहा यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी शहांच्या छातीत लागली. चोरट्यांनी त्यांच्या हातात असलेली अंदाजे तीस लाखाची थैली घेऊन विरार फ़ाट्याच्या दिशेने फरार झाले. या गोळीबार शहा जखमी झाले . त्यांना तातडीने विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनं व्यापार्‍यात मोठी दहशत पसरली आहे. पोलिसांनी तपासासाठी चार पथकही तयार केले आहेत. परंतु, फरार झालेले आरोपी
लवकरच पकडण्यात पोलिसांना यश मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा