साईभक्ती वाढल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ -शंकराचार्य

April 11, 2016 2:28 PM0 commentsViews:

11 एप्रिल : द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती पुन्हा एकदा बरळले. महाराष्ट्रामध्ये पडलेला दुष्काळाला साईभक्त जबाबदार आहे. त्यांची संख्या वाढली असून ते साईंची पूजा करता म्हणून महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय असं वक्तव्य शंकराचार्यांनी केलंय. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर शनिदेवाची पूजा केल्यानं महिलांवरील अत्याचार वाढणार असल्याची दर्पोक्तीही केली.

महाराष्ट्र दुष्काळासारख्या अस्मानी संकटाला सामोर जातोय. जगभरातून याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. पण, द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी दुष्काळग्रस्तांचा जखमेवर मीठ चोळलंय.

shankaracharya on sai baba

शंकराचार्य हरिद्वारच्या यात्रेवर आहे. यावेळी ते म्हणाले, “साईबाबा हे एक फकीर होते. त्यामुळे त्यांची देव समजून पूजा करणे हे अत्यंत चुकीचं असून हे अशुभ आहे. अशा चुकीच्या माणसाची लोकं पूजा करता अशा ठिकाणी दुष्काळ, नैसर्गिक संकट ओढावतं. महाराष्ट्रातही तेच घडलं. कारण, इथं खूप साई भक्त झाले आहे. त्यांच्यामुळेच दुष्काळाचे संकट ओढावले आहे” अशी मुक्ताफळं शंकराचार्यांनी उधळली आहे.

शंकराचार्य यांनी पहिल्यांदा असं वक्तव्य केलं नाहीये. या आधीही त्यांनी साईबाबांवर टीका केली होती. साईबाबांच्या पूजेला शंकरचार्यांनी विरोध दर्शवला होता. एवढंच नाहीतर 2014 मध्ये साई बाबांच्या पुजेच्याविरोधात एक धर्म संसद भरवली होती. या संसदेत साईबाबांच्या पुजेवर बहिष्कार घातला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा