कोल्हापुरात विद्यार्थी सेनेचे आंदोलन

March 22, 2010 11:56 AM0 commentsViews: 1

22 मार्चकोल्हापुरात भारतीय विद्यार्थी सेनेने आज महानगरपालिकेवर मोर्चा काढला. शहरात रस्ते विकासाच्या कामांमुळे ट्रॅफिक समस्या निर्माण झाली आहे. शहरात अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी करत विद्यार्थी सेनेने आंदोलन केले.यावेळी आंदोलकांनी महानगरपालिकेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखले. त्यानंतर उपायुक्त गणेश देशमुख यांनी हे सगळे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

close