छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना आर्थर जेलमधून आणखी एक पत्र

April 11, 2016 5:20 PM0 commentsViews:

मुंबई – 11 एप्रिल :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना आर्थर रोड जेलमधून आणखी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथी आणि शतकोत्तर रौप्य स्मृतीवर्षाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि थोर समाजसेवक ज्योतिबा फुले यांची आज रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

chagan bhujbal133

या पत्रात भुजबळांनी लिहिले आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचं 28 नोव्हेंबर 1890 रोजी निधन झालं. त्याला यंदा 125 वर्षे होत आहेत, त्यानिमित्त राज्य शासनाने 2016 हे वर्ष शतकोत्तर रौप्य स्मृती वर्ष म्हणून पाळावं, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली होती. परंतु आपल्या नेतृत्वातील सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून 28 नोव्हेंबर 2016 ते 28 नोव्हेंबर 2017 या काळासाठी कोणतेही नियोजन केलेलं दिसत नाही. अशा प्रकारचे दुर्लक्ष महाराष्ट्राच्या सामाजिक पुरोगामी विचारांचा अवमान करणारे आहे. तसंच, या काळात सामाजिक परिवर्तनाचे कार्यक्रम आखावे, अशी विनंती छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना केलीय.

या पत्रात छगन भुजबळ यांनी राज्य सरकारद्वारे साजरा करण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती उत्सवाबाबत आनंद व्यक्त केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा