विरार रेल्वे स्टेशनवर भरदिवसा प्रवाशाची हत्या

April 11, 2016 7:56 PM0 commentsViews:

मुंबई – 11 एप्रिल : पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार रेल्वे स्टेशनजवळच्या फूटओव्हर ब्रिजवर आज (सोमवारी) सकाळी भरदिवसा एका माथेफिरू तरुणाने एका प्रवाशाची चाकून भोसकून निर्घूण हत्या केल्याची घटना घडली. या धक्कादायक घटनेमुळे रल्वे स्टेशन परिसरात एकच खळबळ माजली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

virar Murder

महेंद्र पाल असं या माथेफिरू तरुणाचं नावं असून पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात यश आलं. तसंच, तो मनोरुग्ण असल्याचं समजतंय. विरार रेल्वे स्टेशनवर सकाळी 10.30च्या सुमारास फूटओव्हर ब्रिज वर गर्दीच्या वेळी हा माथेफिरू तरुण 10-15 मिनिटं हातात चाकू घेऊन फिरत होता. त्यावेळी ब्रिजवर प्रवाशांची गर्दी होती. त्यातच त्याने अचानक एका प्रवाशावर चाकून वार करण्यास सुरूवात केली. यात प्रवासी गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस तपास करत आहेत. विरार पोलिसांनी महेंद्र पालला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा