मुंबईतही 60 ते 70 हजार मुलं कुपोषित, सरकारचं मात्र दुर्लक्षच!

April 11, 2016 6:27 PM0 commentsViews:

11 एप्रिल :  विवेक कुलकर्णी, मुंबई.

कुपोषण म्हणलं की साधारणत: आपलाल्या मेळघाटचं नाव डोळ्यासमोर येतं. पण मुंबईतल्या झोपट्‌ट्यांमध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठं आहे. पण या याकडे सरकारचं मात्र साफ दुर्लक्ष झालं आहे.

Stravation
ही दृश्यं कुपोषणासाठी ओळखल्या जाणार्‍या अमरावतीतल्या मेळघाट किंवा पालघर जिल्ह्यातल्या जव्हारची नाहीयेत, तर ही दृश्यं आहेत भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईतली.

हा आहे कुर्ल्यातल्या इंदिरानगर इथं राहणारा 12 वर्षांचा अरबाज आणि याचं वजन ऐकून तुम्हाला धक्का बसेल. याचं वजन आहे फक्त 5 किलो. याची सख्खी बहीण गुलअफ्सा. ती सहा वर्षांची आणि तिचही वजन साधारण 5 किलोच. महम्मद तय्यब यांच्या 5 मुलांपैकी 2 मुलं ही अशी जन्मापासून कुपोषितच.अठराविश्व दारिद्र्य, राहण्याच्या आजूबाजूला कमालीची अस्वच्छता, प्यायला मिळणारं दूषित पाणी, आरोग्य सुविधांची वानवा, शिक्षणाचा अभाव आणि जोडीला कुटुंबनियोजनाच्या अभावामुळे आईच्या तब्येतीची हेळसांड या सगळ्या कारणांमुळे मुंबईत झोपड्यापट्‌ट्यांमध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठं आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसल्यानं मग अश्या माणसांची पावलं आपोआप अंधश्रद्धेकडे वळतात.

मुंबईत झोपडपट्‌ट्यांमध्ये राहणार्‍यांपैकी जवळपास 60 ते 70 हजार मुलं कुपोषित आहेत असं या विषयाचे अभ्यासक संजय रोडे सांगतात. त्यांनी केलेल्या कुपोषणाच्या अभ्यासात पुढची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

झोपडपट्‌ट्यातील कुपोषण : 4 वर्षाखालील मुलं

विभाग         मुलं                 मुली
मानखुर्द    26.51 %       13.16%
गोवंडी           100%      99.08%
घाटकोपर  29.17%      33.33%
ठाणे           82.09%     68.97%
मुलुंड          40%           46.15%
भांडुप        55.81           65.85%
मुंबई        38.49%       35.24%

शहरी भागांमध्ये कुपोषण आहे या गोष्टीकडे मुळात फारसं लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळेच प्रश्न कायमच दुर्लक्षित राहला आहे अशी खंत रोडे व्यक्त करतात

सरकार शहरात असलेल्या कुपोषणाचा प्रश्न आहे हे मान्य कधी करणार आणि त्यावर उपाययोजना करणार हाच प्रश्न मुंबईतल्या या झोपडपट्टीवासियांना पडला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा