विदर्भात उद्या जेल भरो

March 22, 2010 12:02 PM0 commentsViews: 4

22 मार्चविदर्भ संग्राम समितीच्या वतीने उद्या जेल भरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 जानेवारीच्या विदर्भ बंदनंतर दिल्ली दरबारी विदर्भाच्या आंदोलनाची फारशी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे जेलभरो आंदोलन करून आपली ताकद दाखवण्याचा विदर्भवाद्यांचा प्रयत्न आहे.काँग्रेसचे नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार सध्या विदर्भात ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन विदर्भाचा मुद्दा पटवून सांगत आहेत. काँग्रेस हायकंमाडपर्यंत स्वतंत्र विदर्भाचा आवाज पोहचावा यासाठी उद्या हे आंदोलन करण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे.यासाठी विदर्भ संग्राम समितीची स्थापना करण्यात आली आहे. 20 जानेवारीच्या विदर्भ बंद आंदोलनात व्यापारीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.तर भाजपने युवा जागर यात्रा काढली होती. खासदार दत्ता मेघे, भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सभा घेऊन स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

close