भिवंडीमध्ये गोदामाला लागलेली आग आटोक्यात, 200 जणांची सुखरूप सुटका

April 12, 2016 1:06 PM0 commentsViews:

bhiwandi_fire3j10 एप्रिल : भिवंडीमध्ये कापडाच्या गोदामाला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. रहिवाशांना सोडवण्याचं कामही आता पूर्ण झालंय. जवळपास 200 जणांची या इमारतीतून सुटका करण्यात आली आहे.

भिवंडीतील कासिमपुरा भागातील एका रहिवासी इमारतीत लागली, ज्यात तळ मजल्यावर कापड साठवण्याची जागा आहे. आग वरच्या मजल्यांवर पोहोचली नाही. पण, आगीचे लोट आणि धूर इतका होता, की सर्व रहिवासी गच्चीवर जाऊन थांबले. आग आटोक्यात येईपर्यंत हे रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन थांबले होते. सुदैवानं अग्निशमन दलाला आग विझवण्यात लवकर यश आलं, आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या 9 गाड्या अजूनही घटनास्थळी आहेत. आग का लागली, हे अजून समजू शकलेलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा