दुष्काळी लातूरमध्ये वॉटर एक्स्प्रेस पोहोचली

April 12, 2016 1:18 PM0 commentsViews:

latur_water_express12 एप्रिल : लातूरकरांची तहान भागवण्यासाठी अखेर वॉटर एक्स्प्रेस लातूरमध्ये दाखल झाली आहे. वॉटर एक्स्प्रेसमधलं पाणी आता विहिरी आणि टँकरमध्ये सोडण्यात आलं आहे. हे पाणी पुढे आता जलशुद्धीकरण केंद्रात पोहचवण्यात येणार आहे.

तहानलेल्या लातूरकरांना आता लवकरच पाणी मिळणार आहे. मिरजहून काल दुपारी निघालेली वॉटर ट्रेन आज पहाटे लातूरमध्ये दाखल झाली. त्यानंतर त्या ट्रेनमधलं पाणी विहिरीत सोडलं जातंय. ही विहीर भरल्यानंतर हे पाणी पाईपलाईनद्वारे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नेलं जाईल, त्यानंतर ते पाणी लातूरकरांना मिळणार आहे. येत्या 4 ते 6 दिवसांत, रोज किमान एक ट्रेन लातूरमध्ये दाखल होईल, अशी माहिती लातूरच्या मनपा आयुक्तांनी दिली. मिरजहून जवळपास 5 लाख लिटर पाणी लातूरला आणण्यात आलंय. पहाटे जेव्हा ही ट्रेन लातूर रेल्वे स्थानकात दाखल झाली, तेव्हा लातूरकरांनी मोटरमनचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा