खूशखबर, यंदा चांगला पाऊस पडणार !

April 12, 2016 5:30 PM0 commentsViews:

rain in maharashtra 33412 एप्रिल : दुष्काळाने होरपळणार्‍या महाराष्ट्राला हवामान खात्याने मोठा दिलासा दिलाय. यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के पाऊस पडणार असं भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तवलंय. मराठवाडा, विदर्भात यंदा चांगला पाऊस होईल असंही हवामान विभागाने स्पष्ट केलंय.

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तरमहाराष्ट्रात पाण्याअभावी नद्या कोरड्या ठाक पडल्याअसून धरणांनी तळ गाठलाय. लातूर आणि परभणीत पाण्याची भीषण समस्या उद्भावली असून रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आलीये. पण, यंदा वरुणराजाची कृपा चांगली असणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. भारतीय हवामान विभागाचे एल.एस.राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण देशाला आनंदाची बातमी दिली. यावर्षी`एल नीनो`ची तीव्रता कमी झाल्यानं त्याचा नैऋत्य मोसमी वार्‍यावर फारसा परिणाम होणार नाही.
त्यामुळे देशभरात यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडणार आहे. यंदा सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. इशान्येकडील काही राज्य , तामिळनाडू आणि रायलसीमा वगळता संपूर्ण भारतात चांगला पाऊस होणार असं राठोड यांनी सांगितलं. तसंच विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस पडणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, 1988 नंतर पहिल्यांदाच इतक्या चांगल्या मान्सूनचं भाकित हवामान खात्याने वर्तवलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा