प्रेग्नन्सी टेस्ट प्रकरणाची चौकशी

March 22, 2010 12:10 PM0 commentsViews: 103

22 मार्चजळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील आदिवासी होस्टेलमध्ये 45 मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचा घृणास्पद प्रकार घडला होता. त्याची बातमी 'आयबीएनलोकमत'ने दाखवली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी आदिवासी विकास प्रकल्पाचे नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त चोपडा शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मुलींच्या पालकांनी केली. प्रकल्प अधिकारी राजेंद्र केंद्रे यांच्या तोंडी आदेशाने तपासणी केली, असे रेक्टर स्वाती सूर्यवंशी यांचे म्हणणे होते. सलग आठ दिवस प्रेग्नन्सी टेस्ट आणि सोनोग्राफीसाठी या मुलींना डॉ. सुनील देशपांडे यांच्या श्री क्लिनीकमध्ये रेक्टरने नेले होते. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांच्या पथकाने डॉ. देशपांडे यांच्या हॉस्पिटलमधील रेकॉर्डची तपासणी केली.

close