मैत्रिणीच्या घरी 20 लाखांचं सोनं लुटणार्‍या मित्राला अटक

April 12, 2016 6:27 PM0 commentsViews:

नवी मुंबई – 12 एप्रिल : आपल्या वर्ग मैत्रिणीच्या मैत्रिणीच्या घरातील 20 लाख रूपये किंमतीचे पाऊण किलो सोने लुटणार्‍या महाविद्यालयीन तरूणाला सोनारासह नेरूळ पोलिसांनी जेरबंद केलंय. सुमीत जाधव असं या तरुणाचं नाव आहे.

navi_mumbai34नवी मुंबईतील नेरूळ य़ेथे राहणार्‍या शेट्टी कुटुंबीयातील शेवटची व्यक्ती कामावर निघताना घराच्या कुलपाची चावी झाडाच्या कुंडीत लपवत असतं. याची माहिती सुमीत जाधवला होती. सरवाणी शेट्टीयांच्यासोबत तिची भाचीदेखील राहते, तिचा मिञ सुमित जाधव अभ्यासासासाठी येत असे.

घरातले लोक चावी कुंडीत लपवतात हे त्याला माहित असल्यानं सुमितनं घरात कुणी नसल्याचा फायदा घेत घरातील पाऊण किलो सोने लंपास केलं. हे सोनं कानाराम गुर्जर नावाच्या सोनाराला विकलं .

शेट्टी कुटुंबियांनी पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला आणि घरच्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाची येजा असते याच्यावर चर्चा झाली. पोलिसांनी घरातील कर्मचाऱ्यांसह सुमितची चाैकशी केली. आधी सुमितने उडाउडवीची उत्तर दिली. पण पोलिसांनी अधिक तपास केला असता सुमितनचं हा सगळा प्रकार केल्याचं पोलीस तपासात उघड झालं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा