खडसेंना जीवे मारण्याची धमकी

March 22, 2010 12:23 PM0 commentsViews: 5

22 मार्चविरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केला आहे.त्यासंदर्भातील एसएमएस खडसेंना आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या 36 तासात मुंबईत मोठा घातपात घडवण्याची धमकी देणारा एसएमएसही खडसेंना आला आहे. याप्रकरणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खडसेंची भेट घेतली. खडसेंना आलेल्या धमकीच्या एसएमएसची चौकशी करण्याचे आदेश आर. आर. पाटील यांनी जॉईंट कमिशनर राकेश मारीया यांना दिले आहेत.

close