मद्यधुंद पोलिसांचा प्रताप, ठाण्यात 6 गाड्यांना ठोकलं

April 13, 2016 1:58 PM0 commentsViews:

thane4234ठाणे – 13 एप्रिल : दारू पिऊन गाडी चालवणं चुकीचंच, पोलीसही याबाबत जनतेला जागृत करत असतात. पण एखादा पोलीसच दारू पिऊन गाडी चालवत असेल तर? काल रात्री ठाण्यात अशी घटना घडली. राबोडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक पुरुषोत्तम अत्राम यानं काल दारू पिऊन 6 गाड्यांना ठोकलं, यात एक जण जखमी झालाय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ठाण्यातील वर्तक नगर भागात पुरुषोत्तम अत्राम याने दारूच्या नशेत बेधुंद गाडी दामटली. यात त्याने सहा गाड्यांना ठोकलं. पोलीस नाईक महाशयांनी हे कृत्य केल्यावर स्थानिकांनी त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. अखेर पोलिसांनी अत्रामला अटक केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा