आंबेडकर जयंती महोत्सवाला पोलिसांनीच नाकारली परवानगी

April 13, 2016 2:24 PM0 commentsViews:

अमरावती – 13 एप्रिल : शहरातील तपोवन परिसरात गेल्या 2002 पासून सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाला पोलिसांनीच परवानगी नाकरल्याची घटना उघडकीस आली आहे.tapovan

विद्यापीठ परिसरात आयोजित असलेल्या हा जयंती महोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी केला जातो. मात्र, शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार फुंडकर यांनी परवानगी नाकारून कलम 149 नुसार नवयुवक पंचशील मंडळाला धमकी वजा नोटीस बजावली आहे.

ज्यामुळे 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती सुद्धा धुमधडाक्यात मंडळाकडून साजरी करता आली नाही. तर पोलिसांनी भाजप नेत्यांच्या दबावाला बळी पडून थोरपुरुषांची जयंती साजरी होऊ देत नसल्याचा आरोप स्थानिक नवयुवक पंचशील मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा