भुजबळ काका-पुतण्यांच्या कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ

April 13, 2016 4:38 PM0 commentsViews:

sameer_And_chagan_bhujbalमुंबई -13 एप्रिल : मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांची 14 दिवसांकरता म्हणजे 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ केलीये.

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना आज विशेष ईडी न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण देण्याची आम आदमी पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली. समीर आणि छगन भुजबळ यांच्यावर बेकायदेशीर कृत्य करणे आणि मोक्का कायदा लावावा या आपच्या मागणीवर 27 एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आलीये. समीर भुजबळ हे 72 दिवस तर छगन भुजबळ यांना दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात आहेत. ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून लवकरच त्यावर न्यायालयात युक्तिवाद सुरू होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा