व्हॅटचा अध्यादेश वैध

March 22, 2010 12:34 PM0 commentsViews:

22 मार्चकाही जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के व्हॅट आकारणीच्या निर्णयाचा अध्यादेश विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवला आहे. त्यामुळे एक टक्का जादा वॅट आकारणीच्या सरकारच्या निर्णयाला एक प्रकारे मान्यता मिळाली आहे. अधिवेशनाला दहा दिवस शिल्लक असताना राज्य सरकारने हा व्हॅट एक टक्क्याने वाढवला आहे. या निर्णयाचा अध्यादेश सरकारने पहिल्याच दिवशी सभागृहात मांडला. पण मान्यतेसाठी असा अध्यादेश सभागृहात मांडता येणार नाही, असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता.

close