अणेंचं विदर्भ प्रेम, चक्क महाराष्ट्राच्या प्रतिकृती केकमधून विदर्भ केला वेगळा !

April 13, 2016 7:59 PM0 commentsViews:

anne_news13 एप्रिल : वेगळ्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणीवरुन महाअधिवक्ता पदावरुन पायउतार झालेले श्रीहरी अणे यांचं वैदर्भिय प्रेमाचा अजब प्रकार पाहण्यास मिळाला. महाराष्ट्राच्या प्रतिकृती असलेल्या केकमधून अणेंनी चक्क वेगळा विदर्भ कापला.

भंडार्‍यात सभेसाठी श्रीहरी अणे आले असतांना रविभवनात विदर्भवाद्यांनी 66 वा अणेंचा वाढदिवस साजरा केला. मध्यरात्री 12 वाजता अणेंनी महाराष्ट्र आणि स्वतंत्र विदर्भ अशा केकमधून विदर्भाचा भाग वेगळा करून आपला वाढदिवस साजरा केला. या केक कापण्याच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा अणेंनी वाद ओढावून घेतलाय. मागील आठवड्यात मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी वेगळा विदर्भाच्या मुद्यावर श्रीहरी अणेंवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा माल वाटलाय का ? जो केकसारखा वेगळा कापून वाटून घ्यायचा अशी टीका राज यांनी केली होती. राज यांच्या टीकेला अणेंनी केक कापून एका प्रकारे उत्तर दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा