आता जातपंचायतीची होणार पंचाईत, सामाजिक बहिष्कार विरोधी विधेयक मंजूर

April 13, 2016 8:38 PM0 commentsViews:

378_12_08_23_jatpanchayat13 एप्रिल : राज्यभरात जात पंचायतीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता ठोस पाऊल उचलले आहे. सामाजिक बहिष्कार विरोधी विधेयकाला आज (बुधवारी) विधानसभेची मंजुरी मिळाली. या विधेयकात बहिष्कार टाकण्याच्या गुन्ह्यासाठी 3 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठवण्याची तरतूद करण्यात आलीये. त्यामुळे यापुढे जात पंचायतीची यापुढे चांगलीच पंचाईत होणार आहे.

जात पंचायत विधेयकांचं सर्व पक्षांनी स्वागत केलं, पण त्याचवेळी इतर महिला संघटनांच्या काय सूचना आहेत. त्यासुद्धा सरकारने लक्षात घ्याव्या अशी विनंती विरोधी पक्षांनी सरकारला केलेली आहे. या विधेयकामुळे जातपंचायतीला चांगलाच चाप बसणार आहे. सामाजिक बहिष्कार हा गुन्हा ठरणार असून 33 संघटनांच्या सूचना आणि हरकती लक्षात घेण्यात आल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

आता जायपंचायतीची पंचाईत

 – मौखिक किंवा लेखी सामाजिक बहिष्काराला बंदी
- कोणालाही धार्मिक विधी, रुढी,रीतीरिवाज यांच्यामध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करणार्‍याला शिक्षा
- कोणत्याही कारणावरून वाळीत टाकण्याला शिक्षा
- सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या गुन्ह्यासाठी 3 वर्षांची शिक्षा, 1 लाख रुपयांपर्यंत दंड
- नुकसान भरपाई म्हणून वसूल केलेल्या रकमेपैकी काही रक्कम पीडितांना देणार
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा