सत्तार प्रकरणी मुख्यमंत्री नरमले

March 22, 2010 1:59 PM0 commentsViews: 2

22 मार्चराज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबादमधील गुंडगिरीकडे कानाडोळा करणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. यात काँग्रेसचा सहभाग असल्यास लवकरच कारवाई करू असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. शिवाय औरंगाबादमध्ये जे झाले, ते योग्य नाही असेही मुख्यमंत्री आता म्हणाले आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल औरंगाबादमध्ये शिवीगाळ करत नगरसेवकाच्या समर्थकाला मारहाण केली होती. पण यात काही विशेष नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सकाळी हात झटकले होते. एकूणच अब्दुल सत्तार यांच्या गुंडगिरीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. नगरसेवकाच्या समर्थकाला मारहाण करणार्‍या सत्तार यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. उलट पोलीस कोर्‍या कागदावर सही मागत असल्याचा खळबळजनक आरोप मारहाणीत जखमी झालेल्या महमद मुश्ताक यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या बेदम मारहाणीत महमद मुश्ताक हे गंभीर जखमी झालेत. त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने मुश्ताक यांना मिलकॉर्नर भागातील साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.मुश्ताक यांच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी मुश्ताक यांनी अजून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही. पण पोलीस आपल्याकडे कोर्‍या कागदावर सही मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. औचित्याचा मुद्दा उपस्थित करणारअब्दुल सत्तार यांच्या गुंडगिरीप्रकरणी आज विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. सत्तार यांना निवेदन द्यायला भाग पाडू, एका राज्यमंत्र्याला हे वर्तन शोभणारे नाही, असे फुंडकर यांनी म्हटले आहे.'मला पश्चाताप नाही'या सगळ्या प्रकरणात आपली काही चूक नाही आणि आपल्यालाला त्याचा पश्चातापही नाही, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. शिवाय मुश्ताक अहमद हा काँग्रेसचा कार्यकर्ताच नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

close