बंगळुरू टेस्ट वाचवण्याचं भारतापुढे आव्हान

October 12, 2008 7:50 AM0 commentsViews: 16

12 ऑक्टोबर,बंगळुरू- ऑस्ट्रेलियाच्या 430 रन्सला उत्तर देताना भारताने पहिल्या इनिंगमध्ये 360 रन्स केल्या आहेत. झहीर खानच्या झुंजार 57 रन्स हा भारतीय इनिंगमधला सर्वोच्च स्कोअर. कालच्या आठ विकेट्स वर 318 या स्कोअरवरून भारताने आज खेळाला सुरुवात केली. आणि झाहीर खान आणि कॅप्टन कुंबळे यांनी भराभर रन्स वाढवण्याचं धोरण अवलंबलं. झहीरने ब्रेट लीला काही देखणे शॉट्स मारले. पहिल्या पाऊण तासातच त्याने आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही त्याची दुसरी हाफ सेंच्युरी. काल हरभजन सिंगच्या साथीने त्याने भारताला तिनशेचा टप्पा ओलांडून दिला होता. आज तो 57 रन्सवर नॉट आऊट राहिला. कॅप्टन अनिंल कुंबळे सहा तर ईशांत शर्मा पाच रन्स करुन आऊट झाले. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग आता सुरु झाली. आणि आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन अनिंल कुंबळे बॉलिंग करण्याची शक्यता कमी आहे. कारण त्याला खांद्याच्या दुखापतीने सतावलंय.उदया पहिल्या टेस्ट मॅचचा शेवटचा दिवस आहे. आता ऑस्टेलिया किती रन्स करून उदया कधी भारताला बॅटिंग करायला देईल याकडे सगळयांचे लक्ष लागलं आहे.

close