आता अणे वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, राज ठाकरेंचा इशारा

April 13, 2016 9:59 PM0 commentsViews:

raj_on_aaney13 एप्रिल : महाराष्ट्राचा केक कापून दोन तुकडे केलेला वाढदिवस अणे आयुष्यभर लक्षात ठेवतील असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. राज ठाकरे यांनी एकाप्रकारे ‘खळ्ळ-फट्याक’चे संकेत दिले आहे.

वेगळ्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणी करणारे माजी महाअधिवक्ता आणि विदर्भ प्रेमी श्रीहरी अणे यांनी वेगळा विदर्भ व्हावा अशी मागणी कृतीतून करुन दाखवलीये. भंडार्‍यात सभेसाठी श्रीहरी अणे आले असतांना रविभवनात विदर्भवाद्यांनी 66 वा अणेंचा वाढदिवस साजरा केला. मध्यरात्री 12 वाजता अणेंनी महाराष्ट्राचा प्रतिकृती असलेल्या केकमधून विदर्भाचा भाग वेगळा करून आपला वाढदिवस साजरा केला.

अपेक्षेप्रमाणे अणेंनी विरोधकांनी अणेंवर सडकून टीका केलीये. विशेष म्हणझे मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी वेगळा विदर्भाच्या मुद्यावर श्रीहरी अणेंवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा माल वाटलाय का ? जो केकसारखा वेगळा कापून वाटून घ्यायचा अशी टीका राज यांनी केली होती. राज यांच्या टीकेला अणेंनी केक कापून एका प्रकारे उत्तर दिलं. आता महाराष्ट्राचा केक कापून दोन तुकडे केलेला वाढदिवस श्रीहरी अणे आयुष्यभर लक्षात ठेवतील असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलाय.

तर दुसरीकडे हिंमत असेल तर अणेंनी गुजरातचे तुकडे करून दाखवावे असं थेट आव्हान शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी दिलंय. तर आता यापुढे वाढदिवस साजरा करतांना विचार करावा लागेल असा इशारा स्वाभिमान संघटनेचे नेते आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा