रत्नागिरीत वणंदगावात बाबासाहेब-रमाईंच्या आठवणींना उजाळा

April 14, 2016 9:28 AM0 commentsViews:

vand3रत्नागिरी – 14 एप्रिल : महामानव डॉ बाबासाहेब यांच्या आठवणींचं आणखी एक विशेष ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिह्यातील दापोली तालुक्यातील वणंद गाव… डॉ.बाबासाहेब यांच्या सुख-दुखात सावली सारखी सोबत करणारी लाखो दिन दुबळ्याची माता, माता रमाई यांचे माहेर रत्नागिरी जिह्यातील दापोली तालुक्यातील वणंद गाव आहे. या ठिकाणी लाखो अनुयायी येऊन नतमस्तक होतात.

बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्त बाबासाहेब आणि रमाईच्या आठवणीला उजाळा देण्यात येत आहे. या गावात मीराताई आंबेडकर यांनी रमाईचे स्मारक उभे केले आहे.

वणंद गावात माता रमाईचे वडील भिकुजी धोत्रे यांचे घर होते. याच ठिकाणी त्यांचे बालपण गेले. मात्र आई – वडील यांचे छत्र हरपल्यावर मात्र मुंबईतील मामाने सांभाळ केला. आयुष्यभर काबाड कष्ट करून बाबासाहेबांना समर्थ साथ दिली. बाबासाहेबांना पाहण्याचा
लहानपणी योग आला. भाषण ऐकण्यासाठी दूरदूरचे लोक येत असतं. बाबासाहेब, रमाई यांच्याबद्दल आमचे पूर्वज सांगायचे त्याचा आम्हला अभिमान आहे, असं प्रत्यक्षदर्शी संगीता धोत्रे सांगतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा