अर्ज दाखल करण्यासाठी नवी मुंबईत गर्दी

March 22, 2010 2:39 PM0 commentsViews: 5

22 मार्चनवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काल उशिरा उमेदवार यादी जाहीर केली. त्यामुळे आज दिवसभर उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. महापालिकेच्या आठ विभाग कार्यालयांमध्ये हे अर्ज स्वीकारले जात होते. वाजतगाजत कार्यकर्त्यांसह उमेदवार अर्ज भरण्यासाठी आले होते. उमेदवारांची गर्दी पाहता प्रशासनाने फॉर्म भरण्याची मुदत दोन तासांनी वाढवली होती.

close