आयएनएस विराट होणार सेवानिवृत्त

April 14, 2016 11:01 AM0 commentsViews:

INS14 एप्रिल : आयएनएस विराट लवकरच नौदलातून सेवानिवृत्त होणार आहे. निवृत्त झाल्यानंतर आयएनएस विराटचं रुपांतर म्युझियममध्ये करण्याचा प्रस्ताव आहे. नौदल प्रमुख आर. के. धोवन यांनी ही माहिती दिली. आज सकाळी आयएनएस विराटवर मेडल वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

गेले 58 वर्षं ही युद्धनौका कार्यरत आहे. आधी ती ब्रिटनच्या नौदलाचा भाग होती. त्यानंतर 1987 साली ती भारतीय नौदलात सहभागी झाली. 28 हजार सातशे टन इतकं तिचं वजन आहे, तर तिची लांबी 226 मीटर एवढी आहे. भारतीय नौैदलाच्या अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये विराटनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयएनएस विक्रांत तर याआधीच निवृत्त झाली. आता विराटही जाणार.. तिची जागा आता आयएनएस विक्रमादित्य घेईल. जगातील सर्वाधीक काळ 58 वर्षे कार्यरत असलेली विमानवाहू युद्धनौका म्हणून आयएनएस विराटचा लौकिक आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा