‘संमेलन देखणेच होणार’

March 22, 2010 2:49 PM0 commentsViews: 4

22 मार्चसाहित्य संमेलन हे देखणचेच होणार, त्यासाठी पैसा खर्च झाला तरी हरकत नाही, असे प्रत्युत्तर पुण्यातील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी दिले आहे. आणि त्यांचे हे प्रत्युत्तर आहे, समाजसेवक डॉ. अभय बंग यांना. पुण्यातील साहित्य संमेलनासाठी गुटखा आणि तंबाखू उत्पादकांचा पैसा नाकारावा, असे डॉ. बंग काल पुण्यात म्हणाले होते. संमेलन साधे झाले तरी चालेल. म्हणजे ते निव्वळ साहित्याचे होईल, असेही त्यांनी म्हटले होते.त्यावर आज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या साहित्य संमेलनाला गुटखा उत्पादक माणिकचंद समुहाचे प्रायोजकत्व घेण्यात आले आहे. हे प्रायोजकत्व घेण्यास बंग यांनी विरोध दर्शवला होता.डॉ. बंग यांच्या या आवाहनावर साहित्य क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत डॉ. बंग यांची भूमिका चुकीची आहे, असे कादंबरीकार राजन खान यांनी म्हटले आहे. तर संमेलन साधेपणानेच झाले पाहिजे. पैशाची उधळपट्टी व्हायला नको, असे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

close