कन्हैया कुमार नागपुरात, बजरंग दलाचा राडा

April 14, 2016 12:38 PM0 commentsViews:

 kanhiya_kumar343

14 एप्रिल : दिल्लीतील जेएनयू स्टुडंट युनियनचा अध्यक्ष कन्हैया कुमार आज (गुरुवारी)नागपूरमध्ये आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण काहीसं तंग झालं आहे. आज सकाळी कन्हैया कुमार नागपुरात आला तेव्हा, विमानतळावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. पाच-सहा कार्यकर्त्यानी कन्हैय्याकुमारची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

प्रगतीशील छात्र युवा संघर्ष समितीनं कन्हैया कुमारच्या व्याख्यानाचे आयोजन केलंय. पंजाबराव देशमुख सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटनांनी कन्हैयाला नागपुरात पाय ठेऊ दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे. तर कार्यक्रमाच्या आयोजकांनी विरोध करणार्‍यांना तशेच उत्तर देऊ असा प्रती आव्हान दिलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीत राजकीय संघर्ष होण्याची चिन्हं आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा