हिंदूत्ववादी संघटनांचा माझ्या हत्येचा कट होता – तृप्ती देसाई

April 14, 2016 4:26 PM0 commentsViews:

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेतल्यानंतर झालेल्या हाणामारीत हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिसांचा मला जीवे मारण्याचा कट होता, असा गंभीर आरोप भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केला आहे.

Tripti Desai213
तृप्ती देसाईला जिवंत सोडू नका, असं हल्लेखोर सतत ओरडत होते. त्यांनी माझे केस ओढले. माझे कपडे फाडण्यात आले. मला बेदम मारहाण करण्यात आली. त्यांनी मला ठार मारायचेच ठरवलं होतं. हल्लेखोरांसोबत मंदिराचे पुजारीही होते, असा आरोप देसाई यांनी केला आहे.

अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करून देवीचे दर्शन घेणाऱया तृप्ती देसाई यांना बुधवारी रात्री काही श्रीपूजक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांनतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र आता त्यांना डिस्टार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेद फडणवीस यांनी हस्तक्षेप करून दोन दिवसांत हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा