डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षल्यांचा गोळीबार; 1 ठार

April 14, 2016 6:47 PM0 commentsViews:

Naxal attack in Gadchiroli23

14 एप्रिल :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात माजी आमदार दीपक अत्राम यांच्या अंगरक्षकाचा मूत्यू झाला. तर दीपक अत्राम थोडक्यात बचावले. नानाडी नागोसे असे मृत अंगरक्षकाचं नाव आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील रेपणपल्ली पालीस ठाण्याच्या हद्दीत छीलेवाडा येथे डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. याचवेळी आलेल्या नक्षलवाद्यांच्या एका गटाने या कार्यक्रमात घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात दीपक अत्राम यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला. हा हल्ला केल्यानंतर नक्षलवादी फरार झाले. याआधीही माजी आमदार दीपक अत्राम यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, माजी आमदार दिपक आत्राम यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी जिल्ह्यातील आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच अतीसंवेदनशील भागातील दौरा पोलीससंरक्षणाशिवाय टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा